कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं 'पांडुरंगाष्टकम' गाणं प्रसिद्ध

By  
on  

टी.व्ही. आणि सिनेमाक्षेत्रात स्वतःच्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या अनेक श्रवणीय गाणी देणारी आर्या आंबेकर ही सध्याची आघाडीची गायिका. आर्या आंबेकरने गायलेली सर्व गाणी आज तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. 

आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आर्या आंबेकरने गायलेलं 'पांडुरंगाष्टकम्' हे गाणं युट्युबवर प्रदर्शित झालं आहे. 'पांडुरंगाष्टकम्' हे संस्कृत स्तोत्र असुन यात विठ्ठलाची भक्ती केली आहे. 

 

आदी शंकराचार्यांनी लिहीलेल्या या स्तोत्राला आर्या आंबेकरने स्वतःचा स्वरसाज देऊन 'पांडुरंगाष्टकम्' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या गाण्याला अल्पावधीतच युट्युबवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Recommended

Loading...
Share