प्रेम किती सुखद भावना असते ना. प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतो आणि प्रेमाच्या रंगीबेरंगी दुनियेत रममाण होतो. पण कधी जर हेच प्रेम बंधन वाटू लागलं तर. तुम्ही कधी कल्पना केलीय याची? वेड्या प्रेमाची ... नाही ना मग लवकरच तुम्हाला अनुभवता येणार आहे वेड्या प्रेमाची प्रेमकथा झी युवा वाहिनीवर.
'तू अशी जवळी रहा' ही अशीच एक वेड्या प्रेमाची प्रेमकहाणी झी युवा वाहिनीवर 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. या नवीन मलिकेचे खुपच रंजक प्रोमो सध्या टीव्हीवर झळकत असल्याने या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
राजवीर मोहिते पाटीलच्या व्यक्तिरेखेत सिध्दार्थ असून तो नेहमीच आपल्या मनाप्रमाणे वागतो आणि त्याला जे आवडतं ते मिळवतोच. दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची म्हणजेच राजवीरच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. राजवीर मनवावर वेड्यासारखं म्हणजे अगदी वेड्यासारखं प्रेम करतो. पण कधी कधी हे अतिप्रेम तिला नकोसं तर नाही ना वाटत? ही दोन भिन्न स्वभावाची माणसं एकत्र येतात, तेव्हा नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वा.
https://www.instagram.com/p/BoTMwA4g-TY/?taken-by=zeeyuva
https://twitter.com/Zee_Yuva/status/1042040748118618112