बिग बींनी अभिनेत्री उषा जाधवला दिलं खास गिफ्ट, पाहा Photo

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील एक सशक्त अभिनेत्री म्हणून उषा जाधव हे नाव सर्वज्ञात आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उषाने फक्त मराठी सिनेमांतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता उषाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि त्याला खुप खास कारण आहे. तिला एक शानदार गिफ्ट मिळालं आहे. पण ह्या गिफ्टपेक्षाही ज्यांनी हे गिफ्ट तिला पाठवलंय त्याचा तिला अवर्णनीय आनंद झाला आहे. दस्तरखुद्द शहनशाह अमिताभ बच्चन यांनी उषाला 'मॅकबुक प्रो' खास भेट म्हणून पाठवलं आहे.  

सोशल मिडीयावर उषाने बिग बींनी दिलेल्या या खास गिफ्टचे फोटो शेअर करुन त्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. उषा आणि बिंग बींनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या 'भूतनाथ रिटर्न्स'  या बॉलिवुड सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी उषाला मिळाली.  

उषाची प्रमुख भूमिका असलेल्या 'फायरब्रॅंण्ड' या सिनेमाचंही बरंच कौतुक झालं.  प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा पहिलाच मराठी सिनेमा. 

चाकोरीबाहेरच्या भूमिकासांठी ओळखल्या जाणा-या उषाच्या आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांना उत्सुकता लागुन राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share