पाहा Video : रणवीरसोबत आपला परश्या झाला एकदम 'सेट'

By  
on  

नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा आणि सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आकाश ठोसर अजुनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याची कुठलीच संधी सोडत नाही. खरंतर अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसताना आकाशने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. 

'सैराट'नंतर  'एफयू' सिनेमा आणि 'लस्ट स्टोरी' ही हिंदी वेबसिरीज या दोन गोष्टींनंतर आता आकाश जाहिरातीमध्ये देखील झळकला आहे व ते पण चक्क बॉलिवुडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहसोबत. रणवीरसोबत आकाश ठोसरने दमदार स्क्रिन शेअर केली आहे. 'सेट-वेट'च्या जाहिरातीमध्ये आकाश आणि रणवीर सिंह एकत्र दिसले . आकाशने ही जाहिरात इंस्टाग्रामवर शेअर केली असून Sada Sexy Raho Man... असं म्हणतं रणवीर सिंहला टॅग केलं आहे.  त्यामुळे चाहते लाडक्या आकाशला रणवीरसोबत पाहून अक्षरश: सैराट झाले आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sada Sexy Raho Man @ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

काही दिवसांपासून आकाश लेह-लडाखमधून नयनरम्य ठिकाणचे आपले वर्क-आऊट करतानाचे अनेक-व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. ‘कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी व्यायाम करतो’,असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. यावरुनच तो किती फिटनेस फ्रिक आहे हे दिसते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Anytime, Anywhere Beast Mode On #beast #pumpedup #bodyholic #fitnessfreak

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

सर्वांनाच आता आकाशच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागुन राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

By the way, I’m wearing the smile you gave me.️ #smile

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

Recommended

Loading...
Share