स्वप्नील -मुक्ताची अफलातून केमिस्ट्री, 'मुंबई पुणे मुंबई 2' ला ४ वर्ष पूर्ण

By  
on  

स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या 'मुंबई-पुणे-मुंबई' सिनेमाची क्रेझ अजूनही ओसरली नाही. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. २०१० साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे २०१५ साली या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 'मुंबई-पुणे-मुंबई 2' सुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. १२ नोव्हेंबर २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई 2' ला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. 

गौतम-गौरीची लव्हस्टोरी असलेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई 2' मध्ये पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली. स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर 'मुंबई-पुणे-मुंबई 2' ची आठवण जागवून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले आहेत. 

 

Recommended

Loading...
Share