By  
on  

अभिनेत्री आदिती द्रविडचा नवा अल्बम ‘यु अँड मी’

अभिनेत्री आणि गीतकार अदिती द्रविडचा नवा अल्बम ‘यु अँड मी’ अल्बम नुकताच युट्यूबवरून रिलीज झाला आहे. माझ्या नव-याची बायको मालिकेत ईशाच्या भूमिकेत दिसणा-या आदिती द्रविडसोबत ह्याच मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसलेली रसिका सुनीलही ह्या नव्या म्युझिक अल्बममध्ये  झळकणार आहेत.

अभिनेत्री-गीतकार आदिती द्रविडने ह्या अगोदर झी टॉकीजसाठी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ हे गाणे लिहीले होते. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात ‘नमन तुला श्रीगणराया’ हे तिचे गाणे नुकतेच आले होते. आता तिचे हे तिसरे गाणे रसिकांसमोर येत आहे. ‘यु अँड मी’ हे गाणे आदितीने लिहीलं असून महत्त्वाचं म्हणजे गायलेही आहे.

आपल्या नव्या ‘यु अँड मी’ अल्बम विषयी आदिती म्हणते, “मी आणि रसिका खुप बेस्ट फ्रेंड आहोत. आपल्या मैत्रीला समर्पित करणारं एक गाणं घेऊन याव असं वाटतं होतं. त्यामूळे आपोआपच शब्द सुचत गेले. सई-पियुषने संगीतबध्द केलेल्या ह्या गाण्याची कोरीओग्राफी फुलवा खामकरने केली आहे. युथफुल शब्द, त्यालाच साजेसे चित्रीकरण आणि डान्स मुव्जमूळे हे गाणे तरूणाईला आवडेल याची खात्री वाटते. आम्ही जवळजवळ 12 कॉस्च्युम्स ह्या गाण्यात घातले आहेत. एखाद्या बिग बजेट हिंदी फिल्मच्या भव्यतेची अनुभूती हे गाणं पाहताना तुम्हांला येईल.”

https://youtu.be/Clwd676mEMU

Author

Recommended

PeepingMoon Exclusive