By  
on  

माधुरीबद्दल प्रश्न विचाराल्यावर नाना पाटेकरांनी थेट विषयच टाळला

सध्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांवर लावलेल्या तथाकथित गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर सध्या याप्रकरणी बरीच उलट-सुलट चर्चा रंगलीय. दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं सूत्रसंचालन असलेला अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत हजेरी लावलीय. म्हणूनच या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. नाना या कार्यक्रमात या वादावर काही बोलणार का याची उत्सुकता आहे.

माधुरी दीक्षित नानांना आवडायची हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये यापूर्वी सांगितलं होतं म्हणूनच सहज-मस्ती वातावरणात गप्पा सुरु असतानाच मकरंद अनासपुरे यांनी माधुरी दिक्षीतबद्दल प्रश्न विचारुन गुगलीच टाकून दिला. मकरंद हसत म्हणाला, नाना तुम्ही माधुरी दिक्षीत यांच्याबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगाल. तेव्हा नानंनी जाऊ दे ना ते..झालं आता आपण यांना विचारु शेतक-यांचा विषय महत्त्वाचा आहे,असं म्हणत नितीन गडकरींकडे आपला मोर्चा वळवत थेट हा विषयच टाळला.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1047102375553576960

नाना आणि माधुरी दीक्षित यांना ‘मोहरे’, ‘प्रहार’, ‘वजूद’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. तसंच एका टीव्ही मुलाखतीत माधुरी दीक्षितवर माझं एकतर्फी प्रेम असल्याची कबुली दिली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive