By  
on  

'आक्रंदन'मध्ये अभिनेते शरद पोंक्षेचा दरारा

आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या बळावर मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये चतुरस्त्र भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात खलनायकी रूपात दिसणार असून त्यांचा वेगळाच दरारा या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवयाला मिळणार आहे. 'आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशिकांत देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स'च्या गोविंद आहेर यांनी 'आक्रंदन’ चित्रपटाची निर्मिती केली असून ‘वंदे मातरम फिल्मस’चे विवेक पंडित चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शरद पोंक्षे सांगतात की, ‘राजाभाऊ’ ही व्यक्तिरेखा मी साकारली असून हा सरपंचाचा लहान माजोरडा भाऊ असून सरपंचाच्या मागे कायम अडचणी निर्माण करण्याचे काम हा करत असतो. अनेक दृष्ट कृत्ये, अनैतिक धंदे, गावच्या स्त्रियांना त्रास देणे यामुळे गावात त्याची दहशत असते. अतिशय नीच अशा पद्धतीची ही व्यक्तिरेखा आहे. मी माझ्या स्टाईलने त्यात रंग भरले आहेत. ‘आक्रंदन’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशील विषय हाताळला आहे. जातीपातीचे राजकारण आजही आपल्याकडे सुरु आहे. आपल्याला त्याची दाहकता दिसून येत नाही. ही दाहकता दाखवतानाच एका मोठ्या बदलाची व पुढाकाराची गरज हा चित्रपट अधोरेखित करतो.

शरद पोंक्षे यांच्या सोबत उपेंद्र लिमये,  विक्रम गोखले, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका 'आक्रंदन' मध्ये पहाता येणार आहेत. ची कथा, शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर दामोदर नायडू यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केलंय. आहे. चित्रपटाची सह निर्मिती मिलन तारी यांनी केली असून संकलन मनोज सांकला यांचे आहे.

'आक्रंदन’ २९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive