सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' ह्या बिगबजेट मालिकेतून भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.
सिनेसृष्टीतल्या सूत्रांच्या अनुसार, “व्हेंटिलेटर, मांजा आणि बकेट लिस्ट या यशस्वी सिनेमांमधून मराठी सिनेसृष्टीत तो लोकप्रिय झाला. एकही रोमँटिक फिल्म न करताही आपल्या देखण्या लूक्समुळे तो आज लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ बनला आहे. आता तो पहिल्यांदा एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे आणि तो ही रोमँटिक अंदाजात.”
सुमेधच्या जवळच्या सूत्रांनूसार, “सुमेधच्या कमालीच्या देखण्या आणि घायाळ करणा-या लूक्समूळेच त्याला कृष्णाची भूमिका मिळाली आणि ह्या पौराणिक हिरोच्या रोमँटिक रूपानंतर आता आजच्या तरूणाच्या रोमँटिक अंदाजात सुमेध त्याच्या चाहत्यांसमोर ह्या अल्बममधून लवकरच येईल.”
चाहत्यांनासुध्दा सुमेधला म्युझिक अल्बमध्ये पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.