By  
on  

संगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’

आजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी सिनेमात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांनीही आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. या जोडीने गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठीत संगीतकार म्हणून पदार्पण करत आहेत. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या आगामी मराठी सिनेमात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.

‘प्रवास’ सिनेमातील गाण्याच्यानिमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि  गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन प्रतिभावान कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतंच संपन्न झालं. ‘प्रवास’च्या निमित्ताने मराठीत पदार्पण करणारे सलीम-सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी हा खुपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.

ओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी  सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.

‘चक दे इंडिया’, ‘अब तक छप्पन’, दोस्ताना’, ‘धूम २’ , ‘फॅशन’ , ‘सिंग इज किंग’ ‘मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल’   ‘हम तुम’ या सारख्या गाजलेल्या सिनेमातील सलीम-सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ही जोडी सज्ज झाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive