क्या बात! प्रसिध्द गझल गायक पंकज उधास मराठीत गाणार, अशोक पत्कींनी दिलंय संगीत

By  
on  

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास आता मराठीतील इनिंगसाठी सज्ज झालेत. पंकज अनुराधा पौडवाल यांची मुलगी कविता हिच्या ‘रंग धनूचा झुला’ या अल्बममध्ये गाणार आहेत. ‘रंग धनूचा झुला’ या अल्बमला अशोक पत्की यांनी संगीत साज चढवला आहे. तर मंदार चोळकर यांनी गीत लिहले आहेत. या बाबत पंकज उधास म्हणतात, मी तीन दशकांच्या करीअरमध्ये पहिल्यांदाच मराठी गाणी गात आहे. मी याबाबत खुप उत्साहित आहे. 

कविता आणि अशोक पत्की यांच्यासोबत काम करण्यास मी खुप उत्साहित आहे. पंकज यांच्या अनेक गझल आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत असतात. चांदी जैसा रंग, आप जिनके करीब होते है, सबको मालूम है मै शराबी नही, एक तरफ उसका घर’ यांसारख्या गजलांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

 याशिवाय बॉलिवूडमध्ये चिट्ठी आयी है, जिये तो जिये कैसे, ना कजरे की धार यांसारख्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आता त्यांच्या मराठी भावगीतांची वाट चाहते आवर्जून पाहात असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share