By  
on  

'बिग बॉस मराठी 2' नंतर किशोरी शहाणे वेबमाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठीमधले अनेक कलाकार डिजिटल विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहेत. तरुण कलाकारांच्या फळीपासून ते अगदी अनुभवी कलाकारांपर्यंत सगळे कलाकार वेबदुनियेत स्वतःला आजमावत आहेत. यामध्ये आता अभिनेत्री किशोरी शहाणे यांचं नाव सुद्धा समाविष्ट झाले आहे. किशोरीताई आगामी'द शटलकॉक मर्डर' या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 

'द शटलकॉक मर्डर' ही वेबसीरिज झी 5 या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. किशोरीताईंची  भूमिका ट्रेलरमधून उलगडत नसली तरी बिग बॉस मराठी 2 नंतर किशोरीताईंच्या या नव्या प्रॉजेक्टची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

'द शटलकॉक मर्डर' मध्ये किशोरीताईंसोबत शिव पंडित, अरुणोधय सिंग, सिकंदर खेर, ह्रिषीता भट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.ही वेबसिरीज १० डिसेंबर रोजी झी 5 वर प्रेक्षकांना पाहत येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive