By  
on  

'गॅटमॅट' सिनेमाचं हे नवीन पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

प्रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी 'गॅटमॅट' सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर  लाँच करण्यात आलं. 'आम्ही जुळवून देतो' अशी हटके टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवरून सिनेमातील प्रमुख कलाकार उलगडले आहेत. अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे ही यंग ब्रिगेड या सिनेमात मुख्य भूमिका साकरणार आहे.

अवधूत गुप्ते ह्यांची प्रस्तुती असलेला यशराज इंडस्ट्रीज निर्मित  'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती आणि निशीथ श्रीवास्तव ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या कथेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेमवीरांसाठी हा सिनेमा एक जबरदस्त ट्रिट ठरणार एवढं मात्र नक्की!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive