By  
on  

'माधुरी’च्या निमित्ताने उर्मिला मातोंडकरचे पतीसोबत मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन

मराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक सिनेसृष्टीतून देखील मराठी सिनेमांचे कौतुक होत आहे. या कौतुकाचे श्रेय मराठी मातीतील कथा, कलाकारांचे अभिनय कौशल्य, मनोरंजनसृष्टीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची मेहनत, दिग्दर्शक आणि मराठी सिनेमावर विश्वास ठेवून त्याची निर्मिती करणारे निर्माते यांना दिले जाते.

बॉलिवूड गाजवणारी आपली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. मराठी सिनेमाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली आहे. यापूर्वी उर्मिलाने आजोबा या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर यांच्यासाठी मराठमोळ्या पत्नीचा मराठी सिनेमा निर्मित करणे ही त्यांच्यासाठी नक्कीच खास बाब असेल. मराठी सिनेमाचे होणारे कौतुक पाहता, मोहसिन यांना मराठी सिनेमा विषयीचे कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे मराठी सिनेमा निर्मितीविषयी काहीही अनुभव नसताना देखील मराठी मातीतील कथा, मराठी कलाकारांचे अभिनय कौशल्य आदी गोष्टींमुळे ‘माधुरी’ या सिनेमाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय पक्का केला. मोहसिन अख्तर मीर यांना जशी मराठीप्रती आवड आहे, त्याचप्रमाणे मुंबईविषयी देखील त्यांना आपुलकी आणि जिव्हाळा आहे हे त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन हाऊस’ या नावावरुन लगेच कळून येते. कोणत्याही कामाला जेव्हा एक कलाकृती म्हणून सादर करायचे असते तेव्हा ‘स्पेशल कनेक्शन’ गरजेचे असते आणि मोहसिन अख्तर मीर आणि मराठी चित्रपट-मुंबईमध्ये एक ‘स्पेशल कनेक्शन’ आहे त्यामुळे प्रेक्षकांना ‘माधुरी’च्या रुपातून एक सुंदर कलाकृती पाहायला मिळणार हे नक्की. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शिकका स्वप्ना वाघमारे जोशी सांभाळणार आहेत.

https://www.facebook.com/realurmilamatondkar/videos/vb.257428438033950/458439877896234/?type=2&theater

या सिनेमाबद्दल सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनीसुध्दा ट्विट करत ही माहिती दिली.

https://twitter.com/taran_adarsh/status/1049931558226866177

एका सुंदर नात्यावर गुंफलेला दर्जेदार, खुसखुशीत आणि सुंदर असा ‘माधुरी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजनी असेल. उत्सुकता वाढवणा-या या सिनेमात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे आणि एकूण या सिनेमाची कथा काय आहे, कलाकार कोण असतील  याविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive