By  
on  

Photos:लाल साडीत खुलुन आलं क्रांती रेडकरचं सौंदर्य

अभिनेत्री, दिग्दर्शक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट अशा अनेक कलांमध्ये पारंगत असलेली अभिनेत्री म्हणते क्रांती रेडकर. क्रांतीने नवं फोटोशूट केलं असून यामध्ये लाल साडीमध्ये क्रांती कमालीची सुंदर दिसत आहे.

क्रांतीने नुकतंच स्वतःच्या मुलींच्या नावांनी 'झिझी' नावाचा फॅशन ब्रँड सुरु केला आहे. 

क्रांतीने 'काकण' हा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 

क्रांती एक नवी कोरी मराठी प्रेमकथा लिहीत असून तिने लिहिलेला हा सिनेमा सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

त्यामुळे एक यशस्वी महिला उद्योजक, एक दिग्दर्शिका, एक पटकथालेखक आणि एक फॅशन आयकॉन अशा अनेक भूमिका क्रांती सध्या लीलया पार पडत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive