मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या मोजक्या कलाकारांमध्ये अतुल परचुरे हे नाव येतं.
मराठी रंगभुमीवर आजही अतुल परचुरेंनी 'नातीगोती' नाटकात साकारलेल्या 'विशेष' मुलाची भुमिका नाट्यरसिकांच्या लक्षात आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत 'वाह गुरु' हे अतुल परचुरेंचं नाटक सुद्धा रंगभुमीवर गाजलं.
अतुल परचुरेंनी एका मुलाखतीत सांगीतलेला किस्सा मात्र लक्षात राहण्याजोगा... 'बुढ्ढा होगा तेरा बाप' या सिनेमाच्या शुटींगदरम्यान अतुल परचुरेंना एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेयर करण्याची संधी मिळाली.
बिग बीं सोबत छोट्याश्या का होईना सीनमध्ये काम करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न. अतुल परचुरे सुद्धा खुश होते पण तितकेच नर्व्हस होते. जेव्हा अमिताभ बच्चन आणि अतुल परचुरेंच्या सीनला दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटले तेव्हा खुद्द बीग बी समोर असल्याने अतुल परचुरेंनी एकाच सीनसाठी अनेक रिटेक्स दिले. यावेळी बाॅलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अतुल परचुरेंना खुप सांभाळुन घेतले.
अतुल परचुरे सध्या 'भागो मोहन प्यारे' मालिकेतुन प्रमुख भुमिका करत असुन रंगभुमीवर 'कापुसकोंड्याची गोष्ट' या बालनाट्यातुन ते प्रमुख भुमिका साकारत आहे. अशा या हरहुन्नरी नटाला पिपिंगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा