अभिनेत्री खुश्बू तावडेचं हे रेट्रो लुक फोटोशूट पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

By  
on  

मराठी मालिकाविश्वातला एक साजिरा गोजिरा चेहरा आणि लाडकी नायिका असं बिरुद मिरवणारी अभिनेत्री म्हणजे खुश्बू तावडे. 'आम्ही दोघी' या मालिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकतंच खुश्बूने एक रेट्रो फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

लाल रंगाचा पोलका डॉट्स आणि काळी पॅंट असा पेहराव केलेल्या खुश्बूने त्याच लाल रंगाच्या पोलका डॉट्सचा स्कार्फ आणि हेअरबॅंडसुध्दा परिधान केला आहे. त्यावर साजेशी अशीच ज्वेलरी तिने घातली आहे. त्यामुळे खुश्बूच्या लुकला चार चॉंद लागले आहेत. 

एका हिंदी मालिकेसाठी खुश्बूने हा खास लुक एका हिंदी मालिकेच्या एपिसोडसाठी केला होता. सध्या ती अभिनेता शर्मन जोशीसोबत एका हिंदी नाटकांतसुध्दा झळकते आहे. 

 

 

 

Recommended

Loading...
Share