अभिनेता सुबोध भावे कुठली ऐतिहासिक भूमिका साकारतोय. आता कुठली नवी मालिका किंवा सिनेमा येतोय, असा प्रश्न तुम्हाला हे वाचून नक्कीच पडला असेल. पण असा कुठलाही ऐतिहासिक सिनेमा किंवा मालिका येत नाहीय. रंगभूमी गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास ‘…..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आगामी सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. याच सिनेमात गुणी अभिनेता सुबोध भावे डॉ. घाणेकरांची व्यक्तिरेखा साकरतोय.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या डॉ. घाणेकरांच्या गाजलेल्या नाटकातील संभाजी महाराजांची भूमिका ‘…..आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. घाणेकरांच्या अभिनय कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रसंगाचं एक चित्रिकरण करण्याचा अनुभव सुबोधने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
“प्रतिभावंत नाटककार वसंत कानेटकर ह्यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि डॉ. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली "रायगडाला जेव्हा जाग येते" या नाटकातील "छत्रपती संभाजी महाराजांची" भूमिका ही त्यांची अजरामर भूमिका . तो प्रसंग चित्रपटात साकारण्या आधी स्वतःच्या मनाची तयारी..
छत्रपती संभाजी महाराजांच्या आशिर्वादानेच हे आव्हान पेलणं शक्य झालं.” असं सुबोध म्हणाला
सर्वांनाच आता दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या ‘…..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाची सर्व आतुरतेने वाट पाहात आहेत.
https://www.instagram.com/p/Bo8RV5thCgA/?taken-by=subodhbhave