By  
on  

मराठी सिनेमा ‘प्रीतम’ मिळतोय मल्याळम टच

मराठी सिनेमांचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी सिनेमांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे बॉलीवूडसह अनेक प्रादेशिक कलावंतांनाही मराठी सिनेसृष्टीने कायमच खुणावलं. पण आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव मराठीत पदार्पण करतंय. विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून दिग्दर्शक सिजो रॉकी हे ‘प्रीतम’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा ‘प्रीतम’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सर्वश्रुत आहेच, पण त्याचसोबत निर्मिती आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. अनेक लघुपटांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.

विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत ‘प्रीतम’ या सिनेमाचं दिग्दर्शन सिजो रॉकी करीत आहेत. “मराठी सिनेमा हा आशयसंपन्न असतो, त्यामध्ये खूप विविधता असते. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय याचा आम्हाला आनंद आहे”, असे सिजो रॉकी यांनी सांगितले. सिनेमाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.

सिनेमाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांची असून, सिनेमाची गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. सिनेमाचे कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश तर संगीत विश्वजीथ यांचे आहे. जयकुमार नायर आणि रफिक टी.एम. सिनेमाचे सहनिर्माते आहेत. गणेश दिवेकर हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत आणि सिजो रॉकी दिग्दर्शित ‘प्रीतम’  या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच कोकणात सुरुवात होणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive