By  
on  

.............म्हणून रणवीर सिंहने दिल्या अमृता खानविलकरला शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आपली मराठी मलगी अमृता खानविलकर यांची दोस्ती जगजाहीर आहेच. प्रत्यक्ष जरी भेटायला जमत नसलं तरी ते नेहमीच एकमेकांना सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छा देताना पाहायला मिळतात, यावरुनच त्यांच्या दोस्ती-यारीची कल्पना येते.

अमृता खानविलकर लवकरच सोनी मराठी या वाहिनीवरील सुपर डान्सर महाराष्ट्र या बच्चेकंपनीसाठीच्या खास पर्वाचे परिक्षण करणार आहे. या निमित्त रणवीर सिंहने अमृताला एका व्हिडीओद्वारे जोशपूर्ण शुभेच्छा दिल्या. ‘मनोरंजन विश्वातली माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर. ती अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान आहे,’ असं तो या व्हिडिओत म्हणत आहे.

आता अमृताला रणवीरने या शोसाठी असं जबरदस्त चिअर केल्यानंतर ती भलतीच खुश झाली असणार यात शंका नाही.

https://twitter.com/AmrutaOfficial/status/1051716493950488576

 

यापूर्वीसुध्दा अमृताने रणवीरच्या वाढदिवसाला त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच अमृताची मैत्रिण अभिनेत्री सोनाली खरे हिची मुलगी रणवीर सिंहची खुप मोठी फॅन असल्याने तिच्या वाढदिवासाठीसुध्दा अमृताने रणवीरकडून खास शुभेच्छा मागवल्या आणि अमृता मावशीची ही इच्छा त्याने पूर्णसुध्दा केली होती.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive