ही आहे उर्मिला मातोंडकरची 'माधुरी','वय विचारू नका!'

By  
on  

माधुरी म्हटलं की, लाखो. दिलों की धडकन. तिच्या एका हास्यावर सारेच घायाळ होतात.पण आता आपल्याला मोहीनी घालायला एक वेगळीच माधुरी अवतरणार आहे.'सो कूल' अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता माधुरीच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. काही दिवसांपूर्वीच रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने आपण मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकत असल्याची घोषणा केली होती. 'माधुरी' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमातील ही प्रमुख व्यक्तिरेखा गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारतेय.

'वय विचारू नका!' अशी काहीशी हटके टॅगलाईनही देण्यात आली आहे. या सिनेमाचा टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे. मुंबापुरी प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाची निर्माते उर्मिला मातोंडकरचे पती मोहसीन अख्तर आहेत. प्रेक्षकांना ‘माधुरी’च्या रुपातून एक सुंदर कलाकृती पाहायला मिळणार हे नक्की. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शिका  स्वप्ना वाघमारे जोशी सांभाळणार आहेत. या सिनेमाची कथा आणि इतर कलाकार यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

यंदा 30 नोव्हेंबर 2018 रोजी 'माधुरी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share