By  
on  

Birthday Special:आपला वाटणारा 'कृष्ण' ते सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशीचा प्रवास

90 च्या दशकात रविवारची सकाळ दूरदर्शवरील कृष्ण मालिका पाहिल्यावर सत्कारणी लागायची. तो गोंडस आणि बोलके डोळे असलेला सर्वांना मोहून टाकत आपलंसं करणारा कृष्ण म्हणजेच अभिनेता स्वप्निल जोशी. मराठी सिनेसृष्टीतला स्वप्निल जोशी हा आजचा आघाडीचा सुपरस्टार आहे.

18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी सिनेमा आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारव्हाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’ आणि ‘मुंबई-पणे-मुंबई सिरीज’ असे सुपरहीट सिनेमे स्वप्निलने प्रेक्षकांना दिले आहेत. सहज-सुंदर अभिनयाचा ठसा उमटविणारा स्वप्निल आता सिनेमांसोबतच निर्मिती क्षेत्राकडेसुध्दा वळला आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीसाठी मागच्यावर्षीचा वाढदिवस खूप खास ठरला. वाढदिवसाच्या साचेबद्ध सेलिब्रेशनपासून काहीसा वेगळा विचार करत स्वप्नील जोशीने त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वप्नीलने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दिले.अवयव दानाचं महत्त्व त्याच्यामुळे चाहत्यांना समजलं.

नेहमीच स्वप्निल सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करतो गणपतीतसुध्दा तो घरातील चांदीच्या मूर्तीची मनोभावे पूजा अर्चा  करुन इको-फ्रेंडली बप्पाचा उत्सव साजरा करतो. सिनेमांनधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा स्वप्निल जोशी अभिनेत्यापेक्षा एक माणूस म्हणून खुप मोठा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive