'दिल दोस्ती दुनियादारी'तील गोड आणि साधी भोळी ऍना आठवतेय ना.. हो तीच ऍना.. जिची सर्व दोस्त मिळून थट्टा उडवायचे. ऍना म्हणजेच अभिनेत्री पूजा ठोंबरेचा नकताच साखरपुडा झाला आहे. तिने सिनेसृष्टीशी निगडीत कुणाल अहिरराव याच्या सोबत साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन शेअर केली. पूजा आणि कुणाल दोघंही पुण्यातील ललित कला केंद्राचे विद्यार्थी आहेत.
पूजा आणि तिचे भावी पती या साखरपुडा समारंभात खुपच गोड दिसत होते. दोघांनीसुध्दा पारंपारिक वेशभूषा केली होती. पूजाने गोल्डन रंगाची व हलक्या केशरी रंगाची बॉर्डर असणारी साडी आणि नथ तर कुणालने कुर्ता पायजमा त्यावर मल्टिकलर जॅकेट आणि पुणेरी पगडी असा पेहराव केला होता. दोघंही अगदी मेड फॉर इच अदरच आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत.
‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे ऍना घराघरात पोहचली असली तरी सध्या 'अमर फोटो स्टुडिओ' ह्या नाटकानेसुध्दा तिला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा