अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनकडून नुकतीच मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोल्हे यांनीच आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत जगदंब क्रिएशन एक नाही दोन नाही तर तब्बल तीन सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जगदंब क्रिएशन्स तीन शिवकालीन चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं.
"वाघनखं...वचपा...गरूडझेप....जगदंब क्रिएशन्स तीन शिवकालीन सिनेमांची निर्मिती करणार - डॉ. अमोल कोल्हेंची घोषणा...'शिवप्रताप' ह्या चित्रपट मालिकेतील पहीला चित्रपट 'वाघनखं' दि. ६ नोव्हें. २०२० ला प्रदर्शीत होणार, ह्या चित्रपटांची निर्मिती मराठी आणि हिंदी भाषेत होणार आहे." , असं अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडीयावरुन स्पष्ट केले आहे.
वाघनखं...वचपा...गरूडझेप
जगदंब क्रिएशन्स तीन शिवकालीन सिनेमांची निर्मिती करणार डॉ. अमोल कोल्हेंची घोषणा...
शिवप्रताप ह्या चित्रपट मालिकेतील पहीला चित्रपट वाघनखं दि. ६ नोव्हें. २०२० ला प्रदर्शीत होणार, ह्या चित्रपटांची निर्मिती मराठी आणि हिंदी भाषेत होणार आहे. pic.twitter.com/gYSD8PXk0N
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2019
दरम्यान, बुधवारी ‘शिवप्रताप वाघनंख’या चित्रपटाचा टीझरही लॉन्च करण्यात आला आहे. ‘जगदंब क्रिएशन्स’ या बॅनरअंतर्गत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकाही सध्या प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन करत आहेत. त्यामुळे आता जगदंब क्रिएशन सिनेमांची निर्मिती करणार ह्यामुळे रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.