'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा आज उलगडणार ट्रेलर

By  
on  

महाराष्ट्राचा पहिला सुपरस्टारच्या सुवर्णकाळाची सुरुवात असं कॅप्शन देत उदय डाबळ यांनी  रेखाटलेली डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही अप्रतिम रांगोळी आहे. आज उलगडणा-या 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' ट्रेलरच्या निमित्ताने या समारंभाप्रसंगी ती रेखाटण्यात आलीय, प्रेक्षकांसोबतच आत्ता संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

नाटकांच्या थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती काशिनाथ घाणेकरसाठी…मराठी प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचून आणलं ते काशिनाथ घाणेकरने…….प्रमुख कलाकार म्हणून आपलं नाव सर्वात शेवटी लावण्याची प्रथा सुरु केली ते काशिनाथ घाणेकरांनी…..मराठी रंगभूमीवरचा पहिला आणि अखेरचा सुपरस्टार म्हणजे काशिनाथ घाणेकर…….असं सांगणारा ‘आणि काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाचा दमदार टिझर आपण पाहिला आता प्रतिक्षा आहे, ती ट्रेलरची.

रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे  योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमारुपात अनुभवता येणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता असं स्थान निर्माण करणारा सुबोध भावे डॉ. घाणेकरांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन,मोहन जोशी, प्रसाद ओक या कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://twitter.com/Viacom18Marathi/status/1053249769798164480

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share