पाहा मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणा-या 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा दमदार ट्रेलर

By  
on  

ज्यांच्या एन्ट्रीला शिट्ट्या पडत, थिएटर दणाणून जात त्या काशिनाथ घाणेकरांचा नाट्यप्रवास आणि जीवनप्रवास घडवणारा 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा दमदार ट्रेलर उलगडला आहे. काशिनाथ घाणेकर या मराठी ंरगभूमीच्या पहिल्या आणि अखेरच्या सुपरस्टारचा उदय आणि अस्त यावर सिनेमा भाष्य करत असल्याचा अंदाज ट्रेलरवरुन येतोय.  ‘तू असामान्य आहेस, आजपासून काशिनाथ घाणेकर पर्व सुरु तर होतेय…’ ‘या थिएटरचा लांडगा एकच आहे आणि तो मी आहे मी…’ , ‘ जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही तोपर्यंत लाल्या होत नाही’ यासारखे संवाद ट्रेलरमध्ये पाहून  सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढलीय.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीमध्ये अतुलनीय योगदान कसे दिले व मराठी व्यावसायिक रंगभूमीचे दिवस कसे सुवर्णकाळात पालटले हे सिनेमात पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी आणि  मोहन जोशी, प्रसाद ओक यांच्याबरोबरच अभिनेत्री अमृता खानविलकरसुध्दा एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत या सिनेमात झळकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमृता या सिनेमामध्ये अभिनेत्री संध्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

https://twitter.com/AmrutaOfficial/status/1053328072630562822

रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे  योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमारुपात अनुभवता येणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता असं स्थान निर्माण करणारा सुबोध भावे डॉ. घाणेकरांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन,मोहन जोशी, प्रसाद ओक या कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://twitter.com/Viacom18Marathi/status/1053313507196715009

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share