By  
on  

दीपिका पादुकोण वाट बघतेय सोनाली कुलकर्णीच्या वरण-भाताच्या स्पेशल ऑफरची

बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतंच एक फोटो शेअर केला आहे. यात मराठीतली अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्यासोबत आहे. दीपिकाने ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे," मी तुझ्या वरण-भाताच्या ऑफरची वाट पाहतेय"

त्यावर सोनालीनेसुध्दा खुप दिलखुलास पोस्ट करत म्हटलंय,  "मी वाट बघतेय त्या दिवसाची जेव्हा माझ्या घराबाहेर अलोट गर्दी होईल आणि सर्वजण माझ्याकडे वरण-भाताची मागणी करतील. तर काही मित्र तेव्हा वेटरच्या भूमिकेत असतील जेणेकरुन त्यांना तुझी छोटीशी झलक पाहायला मिळेल."

 

 

दीपिका पादुकोणची प्रमुख भूमिका असलेला छपाक सिनेमा येत्या 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालच्या सत्य घटनेवर आधारित  असलेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive