By  
on  

महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ‘विदर्भाचे वाघ’ टीम स्वप्नील जोशीच्या मालकीची

क्रिकेट, कबड्डी या खेळांप्रमाणे आता कुस्तीच्या खेळाची लीग देखील सुरु होणार आहे आणि आता मराठी सुपरस्टारच्या मालकीची टीम असणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर कुस्तीची टीम विकत घेऊन स्वप्नीलने एका नवीन जबाबदारीसाठी पाऊल उचललं आहे. महाराष्ट्र कुस्ती लीग मधील ‘विदर्भाचे वाघ’ या टीमची मालकी स्वप्नील जोशीने विकत घेतली आहे.

‘विदर्भाचे वाघ’या टीमचा मालक म्हणून आणि या खेळाप्रती व्यक्त होताना स्वप्नीलने म्हटले की, “आम्ही विदर्भाचे वाघ. मला नेहमीच मैदानी खेळाविषयी आवड होती, त्याबाबतीत मी पॅशनेट होतो पण खेळासाठी कधी काही करण्याची, अथवा एखादा खेळ सातत्याने खेळण्याची संधी मिळाली नाही. अणि अचानक इतक्या मोठ्या कुस्ती दंगलच्या एका टीमचा मालक होण्याचा मान मला मिळालाय ज्यामुळे मी हे खेळ खेळलो नसलो तरी तो खेळ जिवंत ठेवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन नक्कीच देऊ शकतो. आज मी अभिनेता म्हणून जे काही नाव कमावलंय, मला जे प्रेम या महाराष्ट्राच्या मातीत मिळालं आहे, त्याची परतफेड होऊ शकत नाही पण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या कुस्तीसारख्या मैदानी खेळाला जोपासण्याचा हा एक छोटासा प्रयत्न! अणि यासाठी मी नेहमीच ऋणी असेन 'झी महाराष्ट्र कुस्ती दंगल' चा, झी नेटवर्कचा, ज्यानी मला माझी आवड जपण्यासाठी हा मंच दिला. तेव्हा हेच प्रेम माझ्या टीम ला तुम्ही द्याल ही माझी खात्री आहे.”

ना तमा कशाची ना कुणाचा धाक
मैदान मारून नेतील विदर्भाचे वाघ...

आम्ही वाघ येतोय, प्रतिस्पर्ध्यांची शिकार करायला अणि तुमची मनं जिंकायला!”

 

‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या लीगमुळे कुस्ती महासंग्रमाची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. २-१८ नोव्हेंबर या दरम्यान एकूण सहा टीम्समध्ये कुस्तीचा सामना पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive