By  
on  

Video : नवराई नेहा पेंडसेना घेतला भन्नाट उखाणा...'शार्दूलराव आहेत बरे'

गेले आठवडाभर मराठी - हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री नेहा पेंडसे  प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत रविवारी लग्नबंधनात अडकली. या सोहळ्यासाठी जवळचा  मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. तिचा साखरपुड़ासुद्धा असाच खासगी पद्धतीने पार पडला होता. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत लग्नसोहळ्याचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना याची माहिती देत होती. 

लग्नात नेहाने पती शार्दूलसाठी  एक भन्नाट उखाणा घेतला आणि उपस्थित सर्वांनीच हास्यकल्लोळ केला. 'चांदिच्या ताटात फणसाचे गरे.. शार्दुलराव आहेत बरे.. वागतील तेव्हा खरे..' असा उखाणा तिने घेतला. उखाणा घेताना ती हसून हसून वेडी झाली होती. तिचा हा उखाणा खुपच व्हायरल होत आहे. 

महाराष्ट्रीयन पद्धतीची गुलाबी साडी नेसलेल्या नेहाने त्याला साजेसा चोकर आणि 3 लेयर नेकपीस घातला आहे. याशिवाय चंद्रकोर आणि नथ तिच्या लूकला चार चांद लावत आहे. नेहाचा पती शार्दुल सिंगने गुलाबी फेटा, गुलाबी नक्षी असलेला पांढरा कुर्ता असा पेहराव केला आहे. शार्दुल हा पेशाने व्यावसायिक आहे.  

नेहा आणि शार्दुलने मागील वर्षी इटलीमध्ये नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर हे दोघंही कधी लग्न करणार याची चर्चा होती. नेहाच्या लग्नाला अभिजीत खांडकेकर, श्रुती मराठे, हेमांगी कवी आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार उपस्थित होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive