By  
on  

अभिनेत्री रसिका सुनीलचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी

माझ्या नव-याची बायको मालिकेतील 'शनाया' या प्रसिध्द व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. पण तिच्या या प्रसिध्दीचा त्रास मात्र तिच्या आगामी 'गॅट-मॅट' सिनेमाच्या निर्मात्यांना सहन करावा लागला. रसिकाचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चाहते आहेत.
निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आगामी 'गॅटमॅट' सिनेमाच्या सेटवर रसिकाच्या चाहत्यांनी संपूर्ण युनिटला असंच भरपूर हैराण करून सोडलं होतं. रसिकाला बघण्यासाठी तिचे चाहते सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षा भिंतदेखील ओलांडून येत असे. सेटवरील कडक बंदोबस्तामुळे तिच्यापर्यंत पोहोचणे अगर शक्य झाले नाही तर, मोबाईलवरून तिचा गुपचूप फोटो किंवा व्हिडियो काढण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असत. अशाप्रकारे, एेन चित्रीकरणादरम्यान होत असलेल्या चाहत्यांच्या घुसखोरीमुळे सेटवरील कामं बऱ्याचदा खोळंबली देखील होती.
रसिका सुनीलबरोबरच या सिनेमात अक्षय टंकसाळे,निखील वैरागर, पूर्णिमा डे आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अवधूत गुप्ते प्रस्तुत व यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमात रसिकाची प्रमुख भूमिका असून, लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive