By  
on  

'महागुरूं'ची 'एकुलती एक' लेक श्रिया पिळगांवकर झळकणार वेबसीरिजमध्ये

मराठी सिनेसृष्टीचे 'महागुरूं'सचिन पिळगांवकर यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकरसुध्दा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वातील नवनव्या वाटा पादाक्रांत करत आहे. आधी परदेशी भाषांमधील शॉर्टफिल्म्सचं लेखन आणि दिग्दर्शन केल्यानंतर वडिलांच्याच 'एकुलती एक' या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली व मराठी सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर ती नेहमी जाहिरांतीमधूनही झळकत असते. पण बॉलिवूड किंग शाहरुखसोबत फॅन सिनेमात छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याने तिचे प्रचंड कौतुक झाले.

श्रिया पिळगांवकरच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पण यावेळेस कुठलाही मराठी किंवा बॉलिवूड सिनेमा नाही तर ती वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. बहुचर्चित मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये श्रिया भूमिका साकारतेय. गुन्हेगारी जगतावर याची कथा आधारित आहे. यात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, विक्रांत मेसी, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी आदि कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

मिर्झापूर या वेबसीरिजचे दिग्दर्शन गुरमित सिंग यांनी केले असून  करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांनी याची निर्मीती केली आहे.

https://youtu.be/ZNeGF-PvRHY

Author

Recommended

PeepingMoon Exclusive