By  
on  

पाहा Photos : शुभ्रा आणि सोहमची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. चाकोरीबाहेरची प्रेमकहाणी असा हटके विषय छोट्या पडद्यावर घेऊन येऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात ही मालिका यशस्वी ठरली.  निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी कुठल्याही तरुण सेलिब्रिटी जोडीपेक्षाही जास्त लोकप्रिय ठरतेय. 

आपल्या सासूबाई आसावरीच्या पाठीमागे नेहमी खंबीर उभी राहणारी  सूनबाई शुभ्रा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा यंदाचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण. 

 

सोहम व शुभ्राची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड करणार  आहे.

अग्गंबाई सासूबाई' मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण उत्साहात साजरा करणार आहेत.

हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय. तसंच सर्वजण संक्रांतीनिमित्त एकत्र येत पतंग उडवण्याचा आनंदसुध्दा घेतायत. आगामी भागांत आपल्या हा विशेष भाग पाहायला मिळेल. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive