By  
on  

Photo :रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांनी असा साजरा केला सिध्दार्थ जाधवचा वाढदिवस

अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक  रोहित शेट्टी यांनी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ जाधवचा वाढदिवस साजरा केला, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. या दोघांनी मिळून सिध्दूच्या वाढदिवसानिमित्त भरपूर धम्माल केली.

https://www.instagram.com/p/BpWF__bhoVZ/?taken-by=peeping.moon

आता हे कनेक्शन जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल, तर आम्ही सांगतो. अहो, रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा या बॉलिवूड सिनेमात एनर्जी आणि पॉसिटिव्हिटीने भरपूर असलेला आपला मराठमोळा सिध्दार्थ जाधवसुध्दा भूमिका साकरतोय. म्हणूनच त्याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस होता.म्हणूनच सिंबाच्या संपूर्ण टीमने सेटवरच सिध्दूचा वाढदिवस साजरा  केला.

अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत आहे. रोहितसर, रणवीर आणि सिंबाच्या संपूर्ण टिमने दिलेल्या ह्या प्रेमाने मी एकदम कृतकृत्य झालो. ह्या प्रेमाची उतराई करणे शक्य नाही. मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive