मालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे

By  
on  

भूमिकांसाठी कलाकार हे प्रचंड मेहनत घेतात, विविध भाषाही शिकत असतात. मुळच्या आसामच्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी नुकतच एका मालिकेसाठी असं केलं आहे. ‘दादी अम्मा.. दादी अम्मा मान जाओ’ ही त्यांची नवी मालिका लवकरच येत आहे. प्रसिद्ध राजश्री प्रॉडक्शनची ही मालिका आहे. या मालिकेतील आजी-आजोबा मालिकेतील मुख्य कलाकार आहेत. या मालिकेतील आजीची भूमिका सीमा बिस्वास साकारत आहेत. आणि याच मालिकेसाठी त्यांनी चक्क मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.

भाषा शिकतानाचा अनुभव सीमा यांनी सांगीतला, त्या म्हणतात की, "माझ्यासाठी मराठी ही पूर्णपणे नवीन भाषा आहे, मी शो साठी जेव्हा डायलॉग बोलू लागले तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझे पात्र जिवंत जाण्यासाठी मी शब्दाचा योग्य तो उच्चर करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मी भाषेमधील बारकावे शिकण्याचा निश्चय केला. बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी मी मराठी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली! सेटवरची टीम आणि माझे सहकलाकार मला ठराविक शब्द, म्हणी आणि हावभाव समजावून सांगतात. म्हणजे मी ते उत्तम प्रकारे निभावू शकेन. प्रेक्षकांना माझी हि बाजू देखील पाहायला आवडेल अशी अपेक्षा करते."


याच मालिकेत प्रसिद्ध अभिनेता मोहन जोशी देखील आहेत. मोहन जोशी या मालिकेत आजोबांची भूमिका साकारत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share