By  
on  

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं सुपरहिट गाणं 'गोमू संगतीनं' पाहा नव्या रुपात

मराठी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारं गोमू  संगतीनं माझ्या तू येशील का...हे सुपरहिट गाणं नुकतंच नव्या रुपात आणि नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर झालं आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या नटश्रेष्ठांच्या जीवनपटात त्यांच्या सिनेकारकिर्दीत छाप पाडणा-या या गाण्याचा अप्रतिम रिमेक करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. तुम्हालासुध्दा हे गाणं नक्कीच आवडेल.

नाटकांच्या थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती काशिनाथ घाणेकरसाठी…मराठी प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचून आणलं ते काशिनाथ घाणेकरने…….प्रमुख कलाकार म्हणून आपलं नाव सर्वात शेवटी लावण्याची प्रथा सुरु केली ते काशिनाथ घाणेकरांनी…..मराठी रंगभूमीवरचा पहिला आणि अखेरचा सुपरस्टार म्हणजे काशिनाथ घाणेकर…….असं सांगणारा ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा यंदा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रंगभूमी गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास “…..आणि काशिनाथ घाणेकर”  या आगामी सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्सने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे.

 

https://twitter.com/Viacom18Marathi/status/1055776750519664641

 

या सिनेमात रंगभूमीचा तो सुवर्णकाळ  उभा करण्यात आला असून या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.तसंच सुबोधसोबतच या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या कलाकारांच्यासुध्दा या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

“…..आणि काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive