By  
on  

दिग्दर्शक सचिन कुंडलकर म्हणतात,'मराठी साहित्य संमेलन म्हणजे what the fuck फिलिंग'

यवतमाळ येथे यंदा 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कवियत्री डॉ.अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा आपल्या फेसबुक अकाउंटवरुन एक खरमरीत पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मराठी साहित्य संमेलनाला २००० वर्षे आऊटडेटेड, खर्चिक आणि टाईमपास कार्यक्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय.

याआधीही कुंडलकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांना विजू मामा या नावानं शोक व्यक्त करणाऱ्यांवर बोचरी टिका केली होती. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता.

सचिन कुंडलकर फेसबुक पोस्ट करत म्हणतात,"मराठी साहित्य संमेलनासारख्या २००० वर्षे आउटडेटेड आणि खर्चिक टाईमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली कि केस काळे करावेत , दारू सोडावी , व्यायाम सुरु करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करून घ्याव्यात . आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. what the fuck फिलिंग . कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पहायची सवय होती."

 

https://www.facebook.com/sachin.kundalkar.1/posts/10156336241454331

एकरंदरच त्यांची पोस्ट आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आता  लवकरच पुन्हा एक वांदग निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive