By  
on  

सागरिका घाटगे करतेय फुटबॉलची जोरदार प्रॅक्टिस; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री सागरिका घाटगे लवकरच एका आगामी मराठी सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठी ती कसून तयारी करतेय. म्हणूनच सागरिका जोरदार फुटबॉल प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाली. यासाठी ती फुटबॉलचं रितसर प्रशिक्षणही घेतेय. स्पोर्ट्स गर्ल असलेल्या सागरिकाचा 'मॉन्सून फुटबॉल' हा मराठी सिनेमा येतोय. यात ती फुटबॉल टीमच्या कॅप्टनची भूमिका साकारताना दिसेल. नुकताच सागरिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती चक्क एखाद्या गृहिणीसारखी साडी नेसून आणि शूज घालून फुटबॉल खेळताना दिसतेय. त्यामुळेच या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढलीय. मिलींद उके या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत.

मॉन्सून फुटबॉल हा सिनेमा गृहिणींच्या जीवनावर आधारित आहे. यात काही गृहिणी एकत्र येत एका फुटबॉल टीमची स्थापना करतात अशी कथानवर सिनेमा बेतला आहे. एका मुलाखतीत सागरिका म्हणाली होती, “जे नेहमी स्वत:चं एकतात अशा लोकांपैकी मी एक आहे. मला जो सिनेमा करावासा वाटतो तोच मी करते. मग त्याला यश मिळणार का नाही, सुपरहिट होईल का नाही  याचा विचार मी करत नाही. 'चक दे'ची कथा मी फक्त एका ओळीत ऐकून त्यांना होकार कळवला होता. 'मॉन्सून फुटबॉल' या सिनेमात मी आत्तापर्यंत कधीच न साकारलेल्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. महिलांसाठी हा सिनेमा प्रेरणा देणारा ठरणार असून मी याबाबत खुपच उत्सुक आहे.”

'चक दे इंडिया' सिनेमानंतर सागरिका पुन्हा एकदा खेळाशी संबंधित सिनेमा करतेय. यापूर्वी ती अतुल कुलकर्णीसोबत 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमात झळकली होती.

[video width="480" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/10/WhatsApp-Video-2018-10-29-at-12.33.10-PM.mp4"][/video]

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive