By  
on  

अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव यांची पुन्हा धम्माल

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव ही सिनेसृष्टीतील अभिनेत्यांची जोडी आपल्या आगामी सिनेमाद्वारे धम्माल उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. 'माझ्या बायकोचा प्रियकर' असं यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे.
अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'माझ्या बायकोचा प्रियकर' हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचे दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत.

 

  यापूर्वी अनिकेतच्या 'मस्का' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केलं होतं. आता ही जोडगोळी यासिनेमाद्वारे        एकत्र झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive