By  
on  

संदीप कुलकर्णींच्या ‘कृतांत’चा उलगडला टिझर

जेव्हा अष्टपैलू अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा आगामी सिनेमा ‘कृतांत’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता, तेव्हा या सिनेमाबाबत बरीच चर्चा रंगली होती. आता नुकताच या सिनेमाचं मोशन टिझर उलगडलं आहे.“आता होणार मनाच्या अशांतततेचा शांततेकडे जाणारा थरारक प्रवास सुरू!”,असं ‘कृतार्थ’ सिनेमाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवर या मोशन टिझरचं कॅप्शन लिहण्यात आलं आहे. हा टिझर पाहता सिनेमा सस्पेन्स थ्रीलर पठडीतला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

रेनरोज फिल्म्स अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या ‘कृतांत’चे दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केले आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवादलेखन ही जबाबदारी सांभाळली असून ‘कृतांत’चे कथानक आपल्या आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. दरम्यान, या सिनेमात संदीप कुलकर्णी यांच्यासोबतच सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://www.instagram.com/p/BpgwldSnYRa/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

Author

Recommended

PeepingMoon Exclusive