अभिनेता शशांक केतकर हा प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्यांपैकी एक. सध्या त्याची 'मन बावरे' ही मालिका चांगलीच गाजतेय.पण आपण आज शशांकबद्दल नाही तर त्याची पत्नी प्रियांका केतकरबदद्ल बोलणार आहोत.
शशांकची पत्नी प्रियांका ही मराठी मनोरंजन विश्वाशी संबंधित नसली तरी ती कुठल्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. अभिनेत्रीं इतकीच ती तोडीस तोड आहे आणि याची प्रचिची तिच्या ग्लॅमरस फोटोंवरुन नेहमीच येते.
ती नेहमीच इन्स्टाग्रामवरुन आपले विविध ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या या ग्लॅमरस फोटोंची चर्चा नेहमीच रंगताना पाहायला मिळते.
प्रियांका आणि शशांकचं एक इन्स्टाग्रामवर फॅनपेजसुध्दा आहे व त्याच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते नेहमीच कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात.
व्यवसायानं प्रियांका ही वकील आहे. शशांकसोबत ती 2017 साली लग्नबंधनात अडकली. रसिकांची ही आवडती सेलिब्रिटी जोडी आहे.