‘सूर नवा ध्यास नवा’ ची विजेती ठरली अक्षया अय्यर

By  
on  

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महिने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. विविध शैलीतील गायिकेने रसिकांचीमनं या सूरवीरांनी जिंकली. हे दुसरं पर्व सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिलं.

 रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या अंतिम सहा शिलेदारांपैकी अक्षया अय्यरने बाजी मारली आहे. अक्षया अय्यरने सूर नवा ध्यास नवाची राजगायिका होण्याचा मान पटकावला.अक्षयाने पहिल्यापासूनच आपल्या गायिकेने रसिकांना आणि परिक्षकांना मोहून टाकले होते. 

अक्षया अय्यरला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकटयार आणि केसरी टूर्सतर्फे सिंगापूरची टूर मिळाली. तसेच रविंद्र खोमणेला, स्वराली जोशी, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या उपविजेत्यांना कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, तसेच उपविजेते, कॅप्टन्स, सूत्रसंचालक यांना केसरी टूर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर मिळाले.

अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी या महाअंतिम सोङल्याची रंगत वाढवली. 

Recommended

Loading...
Share