By  
on  

अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुढचं पाऊल या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली गोड आणि गुणी अभिनेत्री जुई गडकरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीच नाविन्यपूर्ण मालिकांचा नजराणा घेऊन येणा-या झी युवा वाहिनीवर नव्यानेच दाखल होणा-या वर्तुळ या मालिकेतून जुई नायिका म्हणून झळकणार आहे.
वर्तुळ मालिकेचे प्रोमो पाहून सर्वत्र या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे, जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. जुई मीनाक्षीची भूमिका साकारणार आहे. तर अभिजित परांजपे हा कथेचा नायक आहे ज्याची भूमिका विकास पाटील साकारणार आहे. मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते. मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या आहेत. तिचा भूतकाळ अशा काही प्रकारे तिच्यासमोर येतो कि मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का?

https://twitter.com/Zee_Yuva/status/1055393299643547648

मीनाक्षीचा भूतकाळ नक्की काय आहे? ती सगळ्यांपासून काय लपवतेय? याचा उलगडा लवकरच झी युवा वाहिनीवर होणार आहे. वर्तुळ ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री ९.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive