दिवाळीला अजून दोन-तीन दिवस शिल्लक असले तरी मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने आधीच खास दिवाळीचा जल्लोष साजरा केला. पण यासाठी तिने चारचौैघांसारखं झगमगत्या दुकानात जाऊन खरेदी न करता एक वेगळाच पर्याय निवडला आहे. तुम्हालासुध्दा हे जाणून घेऊन आनंद होईल.
सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ती म्हणाली, "दिवाळीची शॉपिंग करणे हे नेहमीच खास असते. मी येरवाडा जेलमधील दिवाळी मेलाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तिथे विकायला ठेवलेल्या सगळ्याच वस्तू या कैद्यांनी स्वतःच्या हाताने बनवल्या होत्या आणि त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रदर्शन एक आठवड्यासाठी लोकांसाठी खुले असणार आहे. तुम्ही देखील या प्रदर्शनाला भेट द्या आणि या वस्तू खरेदी करा... या कैद्यांना देखील तुमच्या सणाचा, समाजाचा भाग बनण्यास मदत करा आणि सगळीकडेच आनंद पसरवा...खरेदी केलेल्चया वस्तूंचे फोटो आणि येरवडा जेलमधील अधिकाऱ्यांसोबत काढलेला फोटो देखील तिने या पोस्टसोबत शेअर केला आहे.
सर्वांनीच सोनाली कुलकर्णीचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे समाजभान जपण्यास हातभार लावला पाहिजे व सर्वांच्याच आयुष्यात दिवाळीचा हा आनंद द्विगुणीत करायला पाहिजे.
https://twitter.com/meSonalee/status/1057204507904540672