'शाळा', 'आजोबा' आणि सायन्स फिक्शन 'फुंतरू' असे विविध धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येणारा युवा दिग्दर्शक सुजय डहाके लवकरच एक आगळी वेगळी मराठी वेबसिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ५ नोव्हेंबर २०१८, हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचं औचित्य साधत ZEE5 ने आपली नवीन मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ची घोषणा केली आहे.
या नव्या को-या वेबसिरीजची दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन ही सर्वच धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाके सांभाळतो आहे. ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ ६ कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारीत असून त्यांना प्रसिध्द अशा नाट्य स्पर्धेत भाग घ्यावा लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय नाट्य घडते, आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे या मालिकेत पाहायला मिळेल. १० भागांची ही मालिका असून यात नवोदित कलाकारांचा समावेश असणार आहे.
दिर्घ कालावधीनंतर प्रेक्षकांसमोर एक नवी कलाकृती घेऊन येणा-या सुजयला यासाठी खुपच आनंद झाला आहे. लवकरच या वेब सिरीजबाबतचा अधिक उलगडा होईल.