शिवानी रंगोले आणि विराजस कुलकर्णीं ही नवी सेलिब्रिटी जोडी, दिली प्रेमाची कबुली?

By  
on  

मराठी सिनेसृष्टात सध्या नवनव्या जोड्या पाहायला मिळतायत. सध्या अनेकांना आपल्या प्रेमाची कबुली सोशल मिडीयावरुन आपण पाहतोय. सेलिब्रिटी आपलाया जोडीदारासोबतचा फोटो पोस्ट करुन आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा ट्रेण्ड  सध्या भलताच जोरात सुरु आहे. यापूर्वी नेहा पेंडसे, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर आता नुकतंच व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने आणखी एक नवी जोडी चाहत्यांसमोर आणि सिनेवर्तुळासमोर आली आहे. ही जोडी आहे अभिनेता-लेखक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रंगोळे यांची. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे, हे सर्वज्ञात. 

शिवानीने फुंतरु या सिनेमातून पदार्पण केलं. तर बनमस्का या मालिकेतून ती रसिकांची लाडकी बनली सध्या शिवानी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. विराजसने अनेक शॉर्ट-फिल्मचं लेखन-दिग्दर्सन केलं आहे तर कॉलेज डेसारख्या सिनेमातून त्याने पदार्पण केलं. मागच्या वर्षी त्यांच लेखन असलेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला ती अॅण्ड ती हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. तर लवकरच विराजस आता झी मराठीवरील 'तु माझा होशील ना' या मालिकेत नायक साकारतोय. आगामी मालिकेचे प्रोमोज नुकतेच झळकू लागले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yup.

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13) on

 

अनेकदा शिवानी आणि विराजस एकमेकांसोबतचे फोटो सोशल मिडीयावरुन पोस्ट करायचे. पण आता व्हॅलेंटाईन डेनिमित्त दोघांनी एकच फोटो पोस्ट केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yup.️ . . #nufsaid

A post shared by Shivani Rangole (@rangshivani) on

 

Recommended

Loading...
Share