By  
on  

सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्या 'लव्ह यु जिंदगी'चा उलगडला टिझर

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणाया अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटके विषयावर  भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे.

प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच

कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल.

दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस.

एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिली आहे.

कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

https://youtu.be/0CCJj9hM9m8

Author

Recommended

PeepingMoon Exclusive