By  
on  

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘उत्तरायण’ आणि ‘एवढसं आभाळ’ अशा दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणारे दिग्दर्शक बिपीन नाडकर्णी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. ‘दरबान’ या सिनेमातून ते बॉलिवूड पदार्पण करत आहे. या सिनेमाबाबत बोलताना बिपीन म्हणतात, ‘हा सिनेमा बनवताना माझं खुप दिवसाचं स्वप्नपुर्ण झाल्याचं फीलिंग येत आहे.’ 

‘दरबान’ मध्ये शरद केळकर, शरीब हाश्मी, रसिका दुग्गल आणि फ्लोरा सैनी मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालक आणि त्याच्या केअर टेकरमधील हृद्य नातं या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग बराच काळ चाललं. तितका वेळ  एखाद्या व्यक्तिरेखेतील सातत्य कायम राखण्याचं साध्य शरीब हाश्मी यांना साधलं. याशिवाय शरद केळकर आणि हर्ष छाया हे माझे आवडते कलाकार आहेत.’ 

बिपीन यांच्या 2005मध्ये रिलीज झालेल्या ‘उत्तरायण’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमात काम करणारे शरद केळकर म्हणतात, ‘ उत्तरायणनंतर बिपीनसोबतचा हा माझा दुसरा सिनेमा आहे. त्यानंतर त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता. या सिनेमात माझी भूमिका लहान आहे पण महत्त्वाची आहे. ‘दरबान’ माझ्यासाठी खुप स्पेशल सिनेमा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive