By  
on  

Video:सिध्दार्थ जाधव आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या हटके स्टाईल दिवाळी शुभेच्छा

आपला मराठमोळा अभिनेता सिध्दार्थ जाधव याची वर्णी रोहित शेट्टी यांच्या बहुचर्चित ‘सिम्बा’ सिनेमात लागलीय हे आपण सर्वच जाणतो. नुकताच सिंबाच्या सेटवर अभिनेता सिध्दार्थ जाधवचा वाढदिवससुध्दा दणक्यात साजरा झाला. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह यांच्यासह ‘सिम्बा’च्या संपूर्ण टीमने त्याच्या वाढदिवसाचा जल्लोष एखाद्या सणाप्रमाणे केला.

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसतोय. यातच प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज मिळालं. आपल्या लाडक्या सिध्दूने रोहित शेट्टी यांच्याकडून चक्क मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून घेतल्या आणि थोडी मस्तीसुध्दा केली. हे पाहून प्रेक्षक मात्र नक्कीच चकित होणार आहेत.

रोहित शेट्टी यांचा ‘गोलमाल’ हा सिध्दार्थचा पहिला हिंदी सिनेमा होता. आगामी ‘सिम्बा’मध्ये त्याची भूमिका कशी असेल हे पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

[video width="848" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/11/WhatsApp-Video-2018-11-06-at-3.01.33-PM.mp4"][/video]

Author

Recommended

PeepingMoon Exclusive