By  
on  

रितेश देशमुखच्या ‘माऊली’चं लय भारी पहिलं पोस्टर

अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित माऊली हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पहिलंच लय भारी पोस्टर खुद्द रितेश देशमुखनेच लक्ष्मी पूजनाच्या मंगलमयी मुहूर्तावर चाहत्यांसमोर सादर केलं.सर्वांनाच या सिनेमाची आता प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

ट्विटरवर माऊलीचं पहिलं पोस्टर व एक  व्हिडीओ शेयर करत रितेशने कॅप्शन दिलं आहे, “दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! तुमचा माऊली पुन्हा एकदा येतोय तुमच्या भेटीला, लक्ष्मीपूजनाच्या 'लय भारी' दिवशी, माऊलीचं पहिलं पोस्टर!!

https://twitter.com/Riteishd/status/1060080968877436928

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर रितेशने ‘माऊली’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती, पण आता बॉलिवूड किंग आणि मित्र शाहरुख खानच्या सिनेमासाठी मनाचा मोठेपणा दाखवत आपला सिनेमा एक आठवड्यापूर्वीच प्रदर्शित करण्याचं रितेशने ठरवलं आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1060159132123025408

मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून सिनेमात रितेशबरोबर अभिनेत्री सैयामी खेर झळकणार आहे.

अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive