By  
on  

दिग्दर्शन, निर्मिती, संगीत आणि गायकी लिलया सांभाळणारा अवलिया 'अवधूत गुप्ते'

प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते याचा आज वाढदिवस. अवधूतचं नाव काढलं तरी नजरेसमोरून अनेक दर्जेदार गाणी तरळून जातात. पाऊस या अलबम पासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज त्याला प्रस्थापित गायक, संगीतकार बनवून गेला आहे. ऐका दाजीबा या अल्बमने त्याचं नाव सर्वतोपरी केल. मराठीतला आघाडीचा संगीतकार अवधूत गुप्तेची आज तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 

कॉलेज मधील मैत्रीण वैशाली सामंत हिच्यासोबत गायलेल्या, कंपोझ केलेल्या गाण्यांनी त्याने रसिकांना अक्षरशः नाचायला भाग पाडलं. मराठी संगीतात रिमिक्सची सुरुवात केली ती अवधूतनेच. त्यानंतर त्याने रिऍलिटी शोचा जज म्हणूनही काम पाहिलं. चौकटी बाहेर जाऊन काम करण्याची आवड असलेल्या अवधुतने सूत्रसंचालनाचं शिवधनुष्यही लिलया पेललं.

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात खुमासदार सूत्रसंचालनाने रंगत आणली. त्यानंतर झेंडा, मोरया, जय महाराष्ट्र ढाबा भटिण्डा यासारख्या सिनेमातून त्याच्यातील दिग्दर्शकाचं दर्शनही घडलं. सध्या  रिएलिटी शोजचे परिक्षक म्हणूनही ते स्पर्धक आणि प्रेक्षक दोघांच्याही मनावर अधिराज्य गाजवतायत. 

लाडक्या  अवधूतला पिपिंगमून मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive